काश्मीरमध्ये चकमकीत एक आतंकवादी ठार; ‘एके-४७’ रायफल जप्त

आतंकवादाचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेल, हे लक्षात घेऊन सरकारने पाकवर धडक कारवाई करणे अपेक्षित !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनू भागात १७ ऑक्टोबरला सकाळी सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एका आतंकवादी ठार झाला. या वेळी या आतंकवाद्याकडील एक ‘एके-४७’ रायफल जप्त करण्यात आली. या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात शोधमोहीम चालू आहे.

१६ ऑक्टोबरला एक आतंकवादी शरण

१६ ऑक्टोबरला चंडुरा भागात एक आतंकवादी सुरक्षा दलांना शरण आला. या भागातील एका घरात २ आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सैन्याच्या ‘६६ आर्.आर्.’ आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकासमवेत शोधमोहीम चालू केली. या वेळी त्यांची आतंकवाद्यांशी चकमकही झाली.