मुंबईमध्ये महिलांना लोकल प्रवासाची अनुमती

मुंबई – मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्यासाठी राज्य शासनाने अनुमती दिली आहे. सध्या केवळ मुंबई आणि एम्एम्आर् मधील महिलांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

१७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा चालू असेपर्यंत महिला प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी क्यू.आर्.कोडची आवश्यकता असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.