मुंबई आणि उपनगर परिसरात अमली पदार्थाची वाहतूक अन् विक्री करणार्‍या धर्मांधास अटक

२ कोटी ४० लाख रुपयांचा हेरॉईनचा साठा हस्तगत


मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – मुंबई आणि उपनगर परिसरात अमली पदार्थाची वाहतूक आणि विक्री करणारा तस्कर धारावी भागात येणार असल्याची माहिती घाटकोपर येथील अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार धारावी परिसरात सापळा रचून मनझार दिन मोहम्मद शेख (वय ४७ वर्षे) याला अटक करण्यात आली. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) 
त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम वजनाचा ‘हेरॉईन’ या अमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्याची किंमत २ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे. यापूर्वीही त्याच्यावर वर्ष २०१८ मध्ये अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने कारवाई केली होती. (कठोर कारवाई होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय राहिलेले नाही. – संपादक)