कापूस विक्रीच्या नोंदीसाठी शेतकरी ताटकळत 

शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट थांबण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत ! 

वणी (यवतमाळ), १६ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना स्वत:च्या शेतात पिकवलेला कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद करावी लागते. त्यासाठी सात-बारा (कापूस पेरेपत्रक) घेणे आवश्यक असते. सात-बारा तलाठ्याकडून घ्यावा लागत असल्याने त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तलाठ्याकडे पुष्कळ गर्दी असल्याने शेतातील कामे सोडून येणार्‍या शेतकर्‍याला सात-बारा मिळेपर्यंत ताटकळत थांबावे लागते. सात-बारा मिळाल्यावर बाजार समितीत कापूस विक्री नोंदीसाठीही ताटकळत रहावे लागते. १४ ऑक्टोबरपासून या नोंदीला प्रारंभ झाला असून दिवसभरात १ सहस्र ५०० नोंदी झाल्या आहेत.