वणी उपविभागात सोयाबीनची प्रतवारी आणि उतारी अल्प


वणी (यवतमाळ), १६ ऑक्टो. (वार्ता.) – वणी उपविभागात शेतकर्‍याच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची लागवड ८ सहस्र ८४६ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची प्रतवारी आणि उतारी यावर्षी अल्पच आहे. अल्पावधीत रोख उत्पन्न देणार्‍या सोयाबीनच्या या स्थितीने शेतकरी डबघाईस आला आहे, तर पावसाने कापूस मातीमोल होत आहे. या सर्व हानीचे सर्वेक्षण कृषी विभाग करणार आहे.