डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ! – पुणे विभागीय आयुक्त

सौरभ राव

पुणे – आता चालू होणारी थंडी, सण आणि दळणवळण बंदीची शिथिलता यांमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात प्रतिदिन केल्या जात असलेल्या कोरोना चाचणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या १६ टक्के आहे. हेच प्रमाण ऑगस्टअखेरीस २६ टक्के आणि सप्टेंबर अखेरीस २३.५ टक्के होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अल्प असले, तर धोक्याची पातळी न्यून झाली, असे समजले जाते. यावरून अजूनही पुण्यातील धोका पूर्णपणे नष्ट झालेला नसल्याचे लक्षात येते.