नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे आंदोलन

लासलगाव (जिल्हा नाशिक) – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने रहित करावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.