नाव तुझे बिंदाआई ।

श्री. शंकर नरुटे

आई तुझे हे लेकरू, नाव तुझे बिंदाआई (टीप १) ।
आम्हा सर्वांना साधनेचा केंद्रबिंदू दाखवलास तू आई ॥ १ ॥

गुरुकृपेची पर्वणी आम्हा अनुभवण्या शिकवलीस तू ॥
भावभक्तीची कास धरून, गुणसंवर्धन करण्या
शिकवलेस तू ॥ २ ॥

स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यास शिकवले ।
मोहमायेच्या प्रारब्धातून मुक्त होण्या
साधना करण्यास शिकवले ॥ ३ ॥

टीप १ : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक