चैतन्य, आनंद आणि शांती अशा विविध स्तरांवर अनुभूती देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

वर्ष २०१९ च्या सप्टेंबर मासात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. सर्व साधकांची आध्यात्मिक आई असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ जेथे जातात, तेथे त्यांच्यातील चैतन्यामुळे दैवी वातावरण निर्माण होते. भाद्रपद अमावास्या (१७ सप्टेंबर २०२०) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्या देवद आश्रमात जाण्यापूर्वी, गेल्यानंतर, त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीत तेथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येते देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपाने परात्पर गुरु पांडे महाराज आले आहेत’, असे वाटणे, तसेच त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन भावजागृती होणे

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाची वार्ता लिहिलेला फलक वाचतांना श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाची वार्ता लिहिलेला आश्रमातील फलक वाचतांना ‘श्री दुर्गादेवीच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात प्रत्यक्ष समोर आली आहे’, असे मला जाणवले.

कु. सविता भणगे

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनापूर्वी दोन दिवस परात्पर गुरु पांडे महाराज यांची आठवण येणे आणि ‘त्या देवद आश्रमात येणार आहेत’, असे समजल्यावर ‘त्यांच्या रूपात परात्पर गुरु पांडे महाराजच येत आहेत’, असे वाटणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी दोन दिवस मला परात्पर गुरु पांडे महाराज यांची आठवण येत होती. ‘परात्पर गुरु पांडे महाराज सूक्ष्मातून माझ्याजवळ आणि माझ्यासमवेत आहेतच; पण स्थुलातूनही ते असावेत’, असे वाटून मला पुष्कळ रडू येत होते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात येणार आहेत’, असे समजल्यावर ‘त्यांच्या रूपात परात्पर गुरु पांडे महाराजच पुष्कळ प्रेम घेऊन येत आहेत’, असे मला वाटले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला जवळ घेतल्यावर ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझी हाक ऐकली आणि ते श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपाने आले’ याची मला जाणीव झाली.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आश्रमात आल्यापासून मला त्यांच्यामध्ये सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्यांच्या आगमनाने परात्पर गुरुदेवांच्या स्थुलातील सहवासाचा अभाव भरून निघाला.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘पार्वतीमाता कशी असेल ?’, ते मला अनुभवण्यास मिळाले.

५. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील चैतन्याने आश्रमातील वातावरण व्यापून टाकले आहे’, असे जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत मी आश्रमातील विविध ठिकाणी गेले होते. त्या वेळी ‘त्यांचे चैतन्य आणि वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘वातावरणातील वाईट शक्ती निघून जात आहेत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्याने सर्व वातावरण व्यापून टाकले आहे’, असेही मला जाणवले.

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संग घेण्यासाठी खोलीत बसल्यावर ‘देवीचे तत्त्व वातावरणात पसरत आहे’, असे जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संग घेण्यासाठी एका खोलीत बसल्या होत्या. त्या वेळी ‘प्रत्यक्ष देवीच समोर बसली आहे आणि देवीचे तत्त्व खोलीत अन् खोलीच्या बाहेरील वातावरणात पसरत आहे’, असे मला जाणवले.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत गावदेवीची ओटी भरण्यासाठी जातांना ‘एक देवी दुसर्‍या देवीला भेटण्यासाठी जात आहे’, असा विचार मनात येणे आणि ‘गावदेवीच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ओटी भरत आहे’, असे जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत मी गावदेवीची ओटी भरण्यासाठी गेले होते. त्या वेळी माझ्या मनात ‘एक देवी दुसर्‍या देवीला भेटण्यासाठी जात आहे’, असा विचार येत होता, तसेच ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीची ओटी भरत नसून गावदेवीच त्यांची ओटी भरत आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मंदिरात गेल्यावर मंदिरातील वातावरणात चैतन्यमय पालट झाल्याचे मला जाणवले.

८. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गावदेवीची ओटी भरतांना ‘प्रत्यक्ष देवीच समोर आहे’, अशा भावपूर्णतेने त्यांनी ओटी भरल्याचे जाणवणे आणि गावदेवी त्यांना काहीतरी सांगत आहे’, असे जाणवणे अन् भावजागृती होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गावदेवीची ओटी भरतांना ‘समोर गावदेवीची मूर्ती नसून प्रत्यक्ष देवीच आहे’, अशा भावपूर्णतेने त्या ओटी भरत होत्या. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाने गावदेवीला पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला जाणवत होते, तसेच त्या ओटी भरत असतांना ‘गावदेवी त्यांना काहीतरी सांगत आहे’, असे मला जाणवले. हे सर्व पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.

९. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमाजवळील गाढी नदीची ओटी भरल्यावर ‘मी आश्रमाची आणि साधकांची काळजी घेईन’, असे सांगून जलदेवतेने त्यांना आश्‍वस्त केल्याचे जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत मी देवद आश्रमाजवळील गाढी नदीची ओटी भरण्यासाठी गेले होते. त्या नदीची ओटी भरत असतांना नदीचे पाणी एकदम शांत होते. त्या वेळी ‘जणू काही जलदेवता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वाट पहात आहे’, असे मला वाटले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ओटी भरून झाल्यावर जलदेवतेला प्रार्थना केली. त्या वेळी जलदेवतने त्यांना ‘मी आश्रमाची आणि साधकांची काळजी घेणार आहे’, असे सांगितल्याचे मला जाणवले.

१०. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनाने प्राणीमात्रांना आनंद होऊन त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गाडीत बसत असतांना एक कुत्रा सतत त्यांच्या चरणांकडे पहात होता. ‘त्यांच्या आगमनाने त्याला आनंद झाला आहे’, असे त्याच्या हालचालींमधून दिसत होते. ‘त्यांना काहीतरी सांगायचे आहे’, या उद्देशाने तो त्यांच्या जवळ जात आहे’, असे मला वाटले.

११. कृतज्ञता

‘माझी काही पात्रता नसतांनाही देव माझ्यासाठी किती करतो ?’, या विचाराने मला परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात येऊन सर्व साधकांवर प्रीतीचा वर्षाव केला. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. सविता भणगे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.९.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक