माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक आणि जामीन

मुंबई – मुंबईतील माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी १२ सप्टेंबरला अटक करून सोडलेल्या सहा शिवसैनिकांना १५ सप्टेंबरला पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयासमोर उपस्थित केल्यावर त्यांना प्रत्येकी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्यंगचित्र पाठवल्याच्या कारणावरून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना ११ सप्टेंबरला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर वरील प्रकारची कारवाई करण्यात आली होती.