दैनंदिन व्यय चालवणे अशक्य होत असल्याने लहान आणि मध्यम खासगी रुग्णालये सरकारने चालवावीत !

आय.एम्.ए. राज्य शाखेची मागणी

पुणे – कोविड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेले दर लहान आणि मध्यम खासगी रुग्णालयांना परवडत नाहीत. या रुग्णालयांना दैनंदिन व्यय भागवणेही अशक्य होत असल्याने ‘सरकारने आता ही रुग्णालये चालवावीत’, असा पवित्रा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम्.ए.) राज्य शाखेने घेतला आहे. सरकारने आय.एम्.ए.समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य केल्या होत्या; मात्र ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी काढलेल्या परिपत्रकामध्ये एकतर्फी नवे दर लागू केले आहेत. याविरोधात आधुनिक वैद्यांचे राज्यभर आंदोलन चालू आहे.

१५ सप्टेंबर या दिवशी ‘आय.एम्.ए.’ सदस्यांपैकी सर्व मालक त्यांच्या रुग्णालय नोंदीची प्रत ‘आय.एम्.ए.’च्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जमा करणार असल्याची माहिती आय.एम्.ए. राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.