पुण्यात गंभीर रुग्णांसाठी ८२ रुग्णवाहिका सज्ज

पुणे – शहरात ‘ऑक्सिजन’अभावी रुग्णांचा मृत्यू होत असतांना एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हालवण्यासाठी अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुणे शहरासह जिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी ८२ रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट ‘डायल १०८’ सेवेशी संपर्क साधताच रुग्णाला तात्काळ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेच्या सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले की, २४ रुग्णवाहिका ‘अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट’ म्हणजेच अद्ययावत सोयीसुविधांसह सज्ज असतील. ५८ रुग्णवाहिकांत मूलभूत सोयी देण्यात आल्या आहेत.