कलियुगी श्रीविष्णूचा एक अवतार जन्मला ।

स्वभावदोष निर्मूलनाच्या माध्यमातून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

कलियुगी श्रीविष्णूचा अवतार हा जन्माला आला ।

सौ. विमल कदवाने

श्री जयंताचे गोड बालपण लाभले आठवले कुटुंबियांना ॥ १ ॥

मोठेपणी शिक्षणाची आवड भारी, शिकण्यास गेले विदेशाला ।
शिक्षणात उत्तम प्रगती करूनी, आले परत स्वदेशाला ॥ २ ॥

जिज्ञासाने अध्यात्माचे रहस्यमय ज्ञान शोधू लागले ।
तळमळीने सेवा अन् साधना करणारे उत्तम शिष्य प.पू. बाबांना (टीप) भेटले ॥ ३ ॥

जिज्ञासू वृत्ती अती भारी, प.पू. बाबांशी लागले हे शिष्य आवडायला ।
भक्तीचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ शोधूनी काढियला ॥ ४ ॥

प.पू. बाबांच्या कृपाशीर्वादाने सनातन आश्रम निर्मियेला ।
धर्माचा प्रसार करूनी सर्वत्र ज्ञानरूपी प्रकाश जगताला दिधला ॥ ५ ॥

अष्टांगसाधना करूनी प्रत्येक जीव जातो साधकत्वाला ।
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेमुळे साधक जातो संतपदाला  ॥ ६ ॥

टप्प्याटप्प्यांनी करून साधना गुरुकृपेने साधक जातो पूर्णत्वाला ।
परात्पर गुरुदेव डॉ. जयंत आठवले लाभले या सृष्टीला ॥ ७ ॥

त्याग आणि संघर्ष यांतूनच आनंद मिळतो, शिकवले प्रत्येकाला ।
व्यष्टीसंगे समष्टी साधनेची आवश्यकता आहे या कलियुगाला ॥ ८ ॥

ब्राह्मतेजासंगे क्षात्रतेज प्रत्येक जिवात वाढवले ।
सक्षम करोनी साधक राष्ट्र-धर्माच्या सेवेसाठी सिद्ध केले ॥ ९ ॥

धन्य धन्य झाली सृष्टी, पाहूनिया गुरुमाऊलीला ।
कलियुगी श्रीविष्णूचा एक अवतार जन्मला ॥ १० ॥

आकाशातून झाली पुष्पवृष्टी, आनंदी आनंद झाला ।
सर्वत्र आनंदी आनंद झाला ॥ ११ ॥

टीप : प.पू. भक्तराज महाराज

– सौ. विमल विलास कदवाने, बुरहानपूर (ब्रह्मपूर), मध्यप्रदेश. (३.४.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक