१० रुपयांचे आमीष दाखवून मुंबईमध्ये ५ वर्षीय मुलीवर बलात्कार

समाजातील नैतिक अध:पतनाने गाठलेली परिसीमा ! असे प्रकार रोखण्यासाठी समाजाला नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच अत्याचारी व्यक्तीला असा दंड द्यावा की, कुणीही असे दु:साहस करण्याचे धारिष्ट्य करणार नाही !

मुंबई – धारावी परिसरात पाच वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा निंदनीय प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५९ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. ११ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. अत्याचार करणार्‍या नराधमाने पीडित मुलीला अत्याचाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आईला सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तिच्या आईने धारावी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.