भारतातील ७०० हून अधिक गावांना मोगलांची नावे !

हे स्वातंत्र्यानंतरच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मोगलांच्या गुलामीची ही चिन्हे पुसण्यासाठी केंद्र सरकार आणि स्थानिक राज्य सरकार यांनी आता तरी पुढाकार घेतला पाहिजे !

नवी देहली – क्रूर, आक्रमक आणि कट्टर हिंदुद्वेषी असलेल्या मोगलांनी भारतावर वर्ष १५२६ ते १८५७ (३३१ वर्षे) या कालावधीत राज्य केले. त्यानंतरही देशातील गाव, रस्ता, स्मारक आदींना मोगलांच्या सम्राटांची नावे आहेत. भारतातील ६ लाख शहरे, गावे आणि खेडी यांना बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब या पहिल्या ६ मोगल आक्रमकांची नावे आहेत. सर्वाधिक नावे २५१ गावे आणि शहरांची अकबरच्या नावाने आहेत. त्यापाठोपाठ औरंगजेब (१७७ गावे), जहांगीर (१४१), शाहजहां (६३), बाबर (६१) आणि हुमायून (११) यांचा समावेश आहे.

यांपैकी बहुतेक ठिकाणे उत्तर आणि मध्य भारतात आहेत, जिथे मोगल साम्राज्याचे केंद्र होते. भारतीय राज्यांपैकी उत्तरप्रदेश या सूचीमध्ये वरच्या स्थानावर आहे. तेथील ३९६ गावे आणि शहरे यांना मोगलांची नावे आहेत. उत्तरप्रदेशनंतर बिहारचा (९७), महाराष्ट्र (५०) आणि हरियाणा (३९) यांचा क्रमांक लागतो.