धर्मांधांकडून हिंदू नाव सांगून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर आणि विवाह केल्याच्या २ घटना उघड

आगरा (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’

लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कधी प्रयत्न करणार ?

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील सिकंदरा आणि मलपुरा भागामध्ये इकरार आणि बादल खान नावाच्या धर्मांध युवकांनी हिंदु नाव ठेवून अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह केल्याच्या घटना घडल्या आहेत.

१. सिकंदरा येथे १७ वर्षांच्या हिंदु मुलीला सहारणपूर येथील इकरार याने स्वतःचे ‘रवि’ नाव सांगून मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर ही मुलगी त्याच्यासमवेत पळून गेली. नंतर इकरार याने तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर इकरार याला अटक करून मुलीची सुटका करण्यात आली.

२. मलपुरा येथील घटनेत भाड्याच्या घरात रहाणार्‍या बादल खान याने स्वतःचे हिंदु नाव सांगून १७ वर्षीय हिंदु मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. नंतर तिला पळवून नेले. पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बादल खान याला अटक करून मुलीला पालकांकडे सोपवले.