गेवराई (जिल्हा बीड) येथील जय भवानी मंदिरामध्ये चोरी

  • हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

  • मंदिरातील पितळी मूर्ती, रोख रकमेसह देवीचे अलंकार चोरीला

जय भवानी मंदिर

बीड – गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी मंदिरामध्ये १४ सप्टेंबरच्या पहाटे चोरी झाली. यामध्ये चोरांनी पितळी मूर्ती, तसेच रोख रकमेसह देवीचे अलंकार चोरले आहेत. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत हे भव्य मंदिर आहे. अनेक भक्त येथे दर्शनासाठी येत असत. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मंदिरे बंद असल्याने जय भवानी मंदिरही बंद आहे.

या मंदिरात सुरक्षारक्षक बंदोबस्तासाठी असतात; मात्र घटना घडतांना सुरक्षारक्षक येथे उपस्थित नव्हते. मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोचले. पोलीस या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.