कुख्यात गुंड विकास दुबे याचे भूत दिसत असल्याने बिकरू (कानपूर) गावातील गावकर्‍यांमध्ये घबराट

‘भूत नसते’, असे नास्तिकतावादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणत असतात; मात्र जसे विदेशात याविषयी संशोधन केले जाते, तसे मात्र ते करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ‘भूत आहे’ म्हणणार्‍यांवर टीका करत बसतात !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील बिकरू गावामध्ये कुख्यात गुंड विकास दुबे याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार करून ८ पोलिसांची हत्या केली होती. या घटनेनंतर पसार झालेल्या विकास दुबे याला नंतर पोलिसांनी पकडले होते. त्यांच्या कह्यातून पळून जातांना पोलिसांनी विकास दुबे याला चकमकीत ठार केले होते. या पार्श्‍वभूमीवर बिकरू गावात अडीच मासानंतर येथे सायंकाळी विकास दुबे याचे भूत दिसत असल्याचे गावकरी सांगू लागले आहेत. त्यामुळे भीतीपोटी ते सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. लोकांचा दावा आहे की, ‘विकास दुबे याचे भूत रात्री त्याच्या घरावर बसलेले दिसते. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो; पण घरातून बाहेर येत नाही.’

१. गावकर्‍यांचा दावा आहे की, ‘रात्रीच्या वेळी अजूनही बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. विकास दुबे त्याच्या पडक्या घरात दिसतो. या घरात काही लोक चर्चा करत असल्याचेही आम्हाला ऐकू आले आहे. मधेच थोडा हसण्याचा आणि गंमत करण्याचाही आवाज ऐकला आहे. विकास दुबे जिवंत असतांना या घरातून जसे आवाज येत होते, तसेच आवाज आताही येतात.’

२. गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीने सांगितले की, ‘गेल्या आठवड्यात जेव्हा मी रात्री घराबाहेर निघालो, तेव्हा मी विकास दुबे याचे भूत पाहिले.’