गिम्हवणे (तालुका दापोली) येथे महिलेची ३० सहस्र रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे रोखू न शकणारे पोलीस ! पोलिसांना असे गुन्हे रोखण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही कि ते अशा गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करतात ?, हे जनतेला कळायला हवे ! अशा घटना वाढत असल्याने जनतेनेही सतर्क रहाणे आवश्यक आहे !


दापोली – तालुक्यातील आझादवाडी, गिम्हवणे येथे रहाणार्‍या प्रियांका भुवड यांची एका भामट्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक करून त्यांच्या खात्यातील ३० सहस्र रुपये काढून घेतले.

यामध्ये फिर्यादी भुवड यांच्या भ्रमणभाषवर ‘बँक ऑफ बडोदा, कुर्ला मुंबई शाखेतून प्रदीप शर्मा बोलतो आहे’, असा फोन आला होता. त्यानंतर त्यांच्या खात्याची सर्व माहिती एस्.एम्.एस्. करून काढून घेतली होती. भुवड यांच्या खात्यातील ३० सहस्र रुपयांची रक्कम काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत:ची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.