कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सावर्डे (तालुका चिपळूण) येथील बाजारपेठ आणि परिसरातील दुकाने ८ दिवस पुन्हा बंद

सावर्डे ग्राम कृतीदल’ आणि व्यापारी संघटना यांचा एकमताने निर्णय

चिपळूण – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि सावर्डे गावातील वाढती रुग्णसंख्या या पार्श्‍वभूमीवर ‘सावर्डे ग्राम कृतीदल’ आणि व्यापारी संघटना यांच्या वतीने सावर्डे बाजारपेठ आणि परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. येथून पुढे बुधवार (१६ सप्टेंबर) ते बुधवार (२३ सप्टेंबर) असे सलग ८ दिवस गावातील बाजारपेठ आणि परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय घेतांना गावातील ग्राम कृतीदलाचे सदस्य, व्यापारी आणि प्रशासक उपस्थित होते. २४ सप्टेंबर २०२० पासून दुकाने पूर्ववत् चालू होणार आहेत.