कोरोनाची लक्षणे असणार्‍या नागरिकांना ‘अँटीजेन टेस्ट कॅम्प’चा लाभ घ्यावा ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम

चिपळूण पूर्व विभागात लवकरच ५ दिवसीय ‘अँटीजेन टेस्ट कॅम्प’

शेखर निकम

चिपळूण – तालुक्यातील अलोरे, सती आणि पिंपळी येथील ज्या नागरिकांना स्वतःमध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळून येत असतील, अशांसाठी लवकरच ५ दिवसीय ‘अँटीजेन टेस्ट कॅम्प’ आयोजित केला जाणार आहे. तरी या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केले.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सती चिंचघरी विद्यालयामध्ये पिंपळी, सती, खेर्डी आदी पूर्व भागांतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी त्यांनी वरील आवाहन केले.