निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून बंगालमधील ब्राह्मण पुजार्‍यांना विनामूल्य घर आणि १ सहस्र रुपये मासिक भत्ता !

  • सत्तेत असतांना जनतेची कामे न केल्यानेच राज्यकर्त्यांना निवडणुकीत जनतेला अशी आमिषे दाखवावी लागतात. त्यामुळे जनतेलाही अशांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची हीच संधी असते !
  • अल्पसंख्यांकधार्जिण्या ममता (बानो) यांना ब्राह्मणांविषयी इतकेच ममत्व वाटत होते, तर त्यांनी आजपर्यंत ब्राह्मणांना हे साहाय्य का दिले नाही ? आता बंगालमध्ये ममता (बानो) यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान असून ब्राह्मण मतदार भाजपकडे वळू नयेत, हा ममता (बानो) यांचा स्वार्थ न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही !

कोलकाता – निवडणुकीच्या तोंडावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील ब्राह्मण पुजार्‍यांना विनामूल्य घर आणि १ सहस्र रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली आहे. बंगालमध्ये ८ सहस्र ब्राह्मण पुजारी आहेत. याद्वारे बॅनर्जी यांनी राज्यातील ब्राह्मण मतदारांना स्वतःकडे अकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी ‘राष्ट्रीय हिंदी दिवसा’च्या निमित्ताने ‘आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो’, असे सांगत बंगाल सरकारकडून ‘हिंदी अकादमी’ आणि ‘दलित साहित्य अकादमी’ यांची स्थापना करण्याची घोषणा केली.