विशेष अन्वेषण पथक कानपूरमधील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची चौकशी करणार !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आरोपानंतर पोलिसांचा निर्णय

कानपूरच नव्हे, तर संपूर्ण देशातील अशा घटनांसाठी  केंद्र सरकारने आता सीबीआयप्रमाणे एक विशेष अन्वेषण पथकच स्थापन केले पाहिजे ! तसेच अशा घटना रोखण्यासाठी विशेष कायदाही केला पाहिजे !

कानपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांत ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी ८ सदस्यांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाने कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांची भेट घेतली होती. या भेटीत लव्ह जिहादचे सूत्र उपस्थित करण्यात आले होते.

या पथकाला आतापर्यंत जवळपास १२ घटना घडल्याचे आढळून आले आहे. यातील बहुतांश घटना या कानपूरमधील जुही या भागातील आहेत. या घटनांमध्ये इस्लामी  संघटनांची काही भूमिका आहे का ? लव्ह जिहादच्या षड्यंत्रासाठी पैसा पुरवला जातो का ? आदींची चौकशी केली जात आहे. या पथकाने सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क केला असून मागील २ वर्षांच्या कालावधीत लव्ह जिहाद संदर्भात आरोप करण्यात आलेल्या घटनांची माहिती मागवली आहे.