वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत सहस्रो कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेले ! – केंद्र सरकारची स्वीकृती

  • या आरोपींना पळून जाण्यास साहाय्य करणारे आणि हलगर्जीपणा करणारे यांच्यापैकी किती जणांवर सरकारने आतापर्यंत कारवाई केली, हेही सांगितले गेले पाहिजे !
  • सहस्रो कोटी रुपयांचे घोटाळे करून आरोपी देशाबाहेर पळून जातात, हे अन्वेषण यंत्रणांना लज्जास्पद !

नवी देहली – १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत बँक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेले आहेत. सीबीआय ज्या बँक घोटाळ्यांचे अन्वेषण करत आहे, त्यांतील हे आरोपी आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली. या आरोपींमध्ये ९ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या, १२ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मेहुल चोक्सी, १४ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या परिवारातील काही लोकांचा समावेश आहे.


अंमलबजावणी संचालनालय यांनी २० आरोपींच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढण्यासाठी ‘इंटरपोल’कडे विनंती केली आहे, तर १४ आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी विविध देशांत अर्ज करण्यात आले आहेत.