६ सरकारी आस्थापने बंद करण्याचा विचार ! – केंद्र सरकार

नवी देहली – स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटिबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही सरकारी आस्थापने बंद करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

ठाकूर यांनी उत्तरात पुढे म्हटले आहे की, नीती आयोगाच्या निर्गुंतवणुकीच्या निकषांनुसार सरकारने वर्ष २०१६ पासून ३४ आस्थापनांंमध्ये निर्गुंतवणुकीला संमती दिली आहे. यांपैकी ८ आस्थापनांंमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर अन्य ६ आस्थापने बंद करण्यावर विचार चालू आहे. याव्यतिरिक्त २० आस्थापनांंमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.