बलात्कार करणार्‍यांना नपुंसक करायला हवे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फुकाचा संताप

पाकमध्ये फ्रान्सच्या महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण

  • इम्रान खान हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या देशात अशी स्थिती निर्माण होण्याला तेही उत्तरदायी आहेत आणि जर त्यांना ‘अशी शिक्षा द्यायला हवी’, असे वाटते, तर त्यांनीच ती आरोपींना देण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे !
  • पाकमध्ये हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर आणि विवाह केला जातो, याविषयी इम्रान खान यांनी आतापर्यंत काय केले आहे ?, हेही त्यांनी सांगायला हवे !
  • जर बलात्कार्‍यांना अशी शिक्षा देण्यात येऊ शकते, तर भारतानेही यावर विचार करायला हवा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलात्कार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे किंवा नपुंसक करायला हवे, जेणेकरून असा गुन्हा करणार्‍यांच्या मनात एक भीती निर्माण होईल. ज्या प्रकारे खुनाच्या घटनेत ‘फर्स्ट डिग्री’, ‘सेकंड डिग्री’, ‘थर्ड डिग्री’ अशा पद्धतीने शिक्षा असते, त्याच पद्धतीने बलात्कार करणार्‍या आरोपींना शिक्षा असावी. यामध्ये फर्स्ट डिग्री क्रमवारी गुन्ह्यातील आरोपींना रासायनिक पद्धतीने नपुंसक करायला हवे. (अशा पद्धतीत आरोपीचे अंडकोश काढून कामवासना कायमची न्यून करून टाकली जाते.) अनेक देशात याचा वापर केला जात असल्याचे माझ्या वाचण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोरजवळ फ्रान्सच्या महिलेवर तिच्या मुलांसमोर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर व्यक्त केली. या महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर पाकमध्ये संतापाची लाट उसळली आहे.