मुंबईसाठी सकाळी एशियाड, तर रात्री शयनयान एस्.टी. सेवा चालू  

लहान मुले आणि वयोवृद्ध यांनाही आता बसप्रवासास अनुमती 

सांगली – गत मासात २० ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाने एस्.टी. सेवा चालू केली आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. टप्प्याटप्याने नवीन मार्गांवरील वाहतूक चालू करण्यात येत आहे. आता खास मुंबईसाठी सकाळी १०.४५ वाजता सांगली-मुंबई एशियाड आणि रात्री ९ वाजता सांगली-मुंबई (मिरज येथून रात्री ८.३० वाजता) शयनयान एस्.टी. सेवा चालू करण्यात आली आहे. १० वर्षांच्या आतील लहान मुले आणि ६५ वर्षांच्या वरील वृद्धांनाही आता बसप्रवासास अनुमती देण्यात आली आहे. वयोवृद्धांना पूर्वीच्या निम्म्या सवलतीच्या दरात प्रवास करण्यास मिळत आहे, अशी माहितीविभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.

सर्व एस्.टी.च्या फेर्‍यांसाठी पूर्वीचेच सवलतीचे शुल्क आकारण्यात येत असून, केवळ २१ प्रवासी घेतले जात आहेत, तसेच प्रत्येक गाडीची फेरी झाल्यावर ती निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यासह सोलापूर आणि अन्यत्र सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत या गाड्या उपलब्ध आहेत.