कोल्हापूर महानगरपालिकेला प्रदूषण नियंत्रण विभागाची नोटीस 

जैव-वैद्यकीय कचर्‍याचे विल्हेवाट प्रकरण

कोल्हापूर – कोरोनाच्या काळात तिपटीने वाढलेल्या जैव-वैद्यकीय कचर्‍याची हाताळणी योग्य प्रकारे न केल्याने आणि विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आरोग्य अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘प्रकल्पातील कामगारांना आवश्यक ती साधने पुरवली जात नाहीत, कचरा ज्या वाहनातून मुंबई येथे जातो, त्याच्या नोंदी आढळून आल्या नाहीत’, असे नमूद करून कायदेशीर कारवाई का करू नये ? याचा खुलासा करावा, असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी कसबा बावडा झूक प्रकल्पावरून जैव-वैद्यकीय कचरा मुंबई येथे पाठवतांना आवश्यक ती दक्षता न घेतल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.