‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत व्यापार्‍यांनी सहभागी व्हावे ! – अतुल शहा, अध्यक्ष, महाराष्ट्र व्यापारी महासंघ 

सांगली – सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन पुष्कळ प्रयत्न करत आहेत; मात्र नागरिक त्याची गांभीर्याने नोंद घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष श्री. अतुल शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, 

१. व्यापारी सामाजिक माध्यमातून जागृती करून नागरिकांना कोरोनाविषयी जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
२. कोरोनाच्या संदर्भात शासनाने घालून दिलेली नियमावली व्यापार्‍यांनी काटेकोरपणे पाळावी. दुकानासमोर सामाजिक अंतराच्या खुणा करणे, ग्राहकांना ‘सॅनिटाईज’ करून  दुकानात प्रवेश देणे, दुकानात गर्दी न होण्यासाठी प्रयत्न करणे, खोकला अथवा अन्य लक्षणे दिसल्यास संबंधित ग्राहक अथवा कामगार यांना दुकानात प्रवेश देणे टाळणे, अशा गोष्टींची कार्यवाही काटेकोरपणाने करावी.