कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्‍वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पंतप्रधानांना निमंत्रण ! – जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंदगिरी महाराज

मध्यभागी जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंदगिरी महाराज

मिरज –  प्रभु श्रीरामचंद्र यांनी स्थापन केलेल्या मिरजेच्या कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्‍वराच्या जिर्णोद्धारासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याच निमित्ताने देशाच्या सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी ११ सहस्र बाटल्या रक्त संकलन करून पाठवल्या जाणार आहेत, अशी माहिती जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंदगिरी महाराज (द्वारका, गुजरात, जुना आखाडा) यांनी १४ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्रीक्षेत्र मार्कंडेश्‍वर देवस्थान पिठाचे संचालक श्री. राजन महाराज उपस्थित होते.

(सौजन्य : SANGLI NEWS)

जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंदगिरी महाराज म्हणाले,

. मिरजेच्या कृष्णा घाटावरील ४०० वर्षांपूर्वीच्या या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा मानस आहे. त्यानिमित्ताने १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रम होत असून पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले आहे.

२. याच कार्यक्रमात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वजनाएवढी रक्ततुला करून ते रक्त देशाच्या सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी पाठवले जाणार आहे. याचा प्रारंभ २५ ऑक्टोबरपासून होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग सहभागी होणार आहे.