सोलापूर येथील वृद्ध महिलेचे निवृत्तीवेतन रिक्शातील अन्य बुरखाधारी महिलांनी पळवले

सोलापूर – येथील गजराबाई शिंदे नावाची वृद्ध महिला निवृत्तीवेतनाची ३१ सहस्र रुपये रक्कम अधिकोषातून काढून रिक्शातून घरी निघाल्या होत्या. तेव्हा रिक्शातील अन्य बुरखाधारी महिलांनी त्यांच्या पिशवीतील रक्कम सदरबझार परिसरात लंपास केली, अशी तक्रार सदर वृद्ध महिलेने पोलिसांत केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य असणारे चोर्‍यामार्‍या करण्यात मात्र आघाडीवर असलेले नेहमीच दिसतात. त्यांची गुन्हेगारी वृत्ती मोडण्यासाठी पोलीस काही पावले उचलणार का ? – संपादक)