संपूर्ण भारत पुढे काश्मीरसारखा इस्लाममय होण्याची शक्यता

१४ सप्टेंबर २०२० या दिवशी ‘काश्मिरी हिंदू बलीदानदिन’ झाला. यानिमित्ताने…

१. काश्मीरमधील हिंदूंचा उर्दू भाषेत संवाद

संपूर्ण भारतात अत्यंत भव्य परंपरा असलेल्या निवडक काही राज्यांत जम्मू-काश्मीर हे एक आहे. (केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वी) या राज्याचा राज्यकारभार काश्मीरमध्ये उन्हाळ्यात, तर जम्मूमध्ये हिवाळ्यात चालतो. जम्मू भागात जसे पंडित आहेत, तसे डोग्रा वर्गातील हिंदू ६४ टक्के आणि काश्मीरमध्ये ९६ टक्के मुसलमान रहातात. जम्मू-काश्मीरमध्ये ‘उर्दू’ हीच राज्यकारभाराची किंवा अधिकृत भाषा आहे. जम्मूमध्ये डोग्रा, हिंदु आणि पंजाबी लोक यांची बोलीभाषा असली, तरी सर्वांना उर्दू भाषा ओळखीची आहे. त्यामुळे ते एकमेकांमध्ये उर्दूमध्येच बोलत असतील, तर आश्‍चर्य वाटायला नको. पूर्वी केवळ भारतीय भाषाच बोलल्या जात असलेले काश्मीर मोगलांच्या आक्रमणानंतर स्वत:ची संस्कृती आणि भाषा गमावून बसले आहे. जनमानसावर इस्लाम अन् उर्दू वरचढ ठरले आहे.

२. काश्मिरी पंडित मायभूमीत परतण्याच्या आशेवर

इस्लामच्या आक्रमणानंतर काश्मीर निवासी असलेले ‘पंडित’ ब्राह्मण जम्मूच नव्हे, तर भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहू लागले आहेत. कुठेही रहात असले, तरी मातृभूमीच्या आठवणी ते विसरलेले नाहीत. ‘परत जाऊन सामान्यांप्रमाणे मग गरिबीत रहावे लागले, तरी चालेल; पण काश्मीरमध्ये जाऊनच रहावेे’, असे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. (सध्याच्या केंद्र सरकारने कलम ३७० आणि ३५ अ रहित केली आहेत. त्यामुळे सरकार काश्मीर संदर्भात घेत असलेल्या निर्णयांवरून काश्मिरी हिंदूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. – संकलक) काश्मीरमधील अल्पसंख्यांक हिंदू धर्मांधांच्या अत्याचारांना बळी पडत तर आहेतच, तसेच त्यांना स्वत:चे घरदार सोडून बाहेर पडावे लागत आहे.

३. बेंगळुरू येथील काश्मिरी पंडितांचा परंपरांच्या रक्षणासाठीचा प्रयत्न

बेंगळुरू येथे रहाणार्‍या काश्मिरी पंडितांनी एकत्रित येऊन ‘काश्मिरी हिंदू कल्चरल वेल्फेअर ट्रस्ट’ या नावाने संघटना उभारली आहे. पंडितांना संघटित करून लोकांसाठी उपयुक्त कार्य करणे, ‘पंडितांचा आत्मविश्‍वास वृद्धींगत करून त्यांच्या परंपरांचे स्मरण पुढे चालत राहील’, असे प्रयत्न संघटना करत आहे.

सध्याचे विद्यार्थी मित्र, संशोधक टी.एस्. दक्षिणमूर्ती यांच्या समवेत संघाचे अध्यक्ष आर्.के. मट्टू यांच्या घरी जाऊन संवाद साधत पंडितांच्या सामाजिक रचनेविषयी थोडी माहिती, तसेच अन्य गोष्टी संग्रहित करून छोट्या लेखनातून वाचकांसमोर मांडत आहेत. मट्टू यांच्या संपादनाखाली प्रकाशित होत असलेल्या एका मासिकात त्यांनी म्हटले आहे की, ‘काही झाले, तरी काश्मिरी पंडित त्यांच्या मूळ घरी परत जातील. इतर ठिकाणी त्यांनी निर्माण केलेल्या संकुलाकडे नाही. सक्तीने स्थलांतर करण्यापूर्वी जोपर्यंत ते त्यांच्या मूळ स्थानी परत जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या परत येण्याला अर्थ नाही.’

हिंदूंना काश्मीरमधून बळजोरीने हाकलले आहे. ते सहस्रो हिंदू धर्मांध आणि जिहादी यांच्याकडून मारले गेल्याचे डोळ्यांनी पाहिलेले, हत्या झालेल्यांच्या वंशातील आहेत. वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी शेकडो पंडिताची गोळ्या घालून सामूहिक हत्या केली. १९ जानेवारी १९९० हा दिवस अजूनही काश्मिरी पंडित ‘सामूहिक वधदिन’ म्हणून पाळतात. त्या भयंकर रात्री सहस्रो पंडितांनी स्वत:च्या सर्व वस्तू, साहित्य आहे तिथेच टाकून काश्मीर खोर्‍यातून पलायन केले. त्या वेळी हत्या झालेल्या पंडितांच्या घरांवर गिधाडे मांसासाठी फिरत होती. पंडित तर मातृभूमीला आठवून ते एकदा तरी डोळ्यांतून पाणी ढाळत आहेत.

४. काश्मीरमधील पंडितांचे रहाणीमान आणि त्यांच्या प्रथा-परंपरा

अ. काश्मीरमधील पंडितांची उपनावे आणि भाषा : ‘पंडित म्हणजे विद्वान, ज्ञानी’ असा अर्थ आहे. ‘भट्ट’ म्हणून अजूनही एक नाव असलेल्या या वर्गाचे लोक सारस्वत ब्राह्मण. यांचे उपनाव किंवा वंशावळी अनेक आहेत. यामध्ये कौल, धर, पोतेदार, पंडित, रैन, शिवपुरी, हिंदू, नेहरू, मट्टू, जलपुरी, कच्रु इत्यादींचा समावेश आहे. बहुतेक शहरवासी असलेल्यांची मातृभाषा काश्मिरी आहे. संस्कृत विद्वान देवनागरी लिपी वापरत असले, तरी धर्मांधांच्या प्रभावामुळे काश्मिरी भाषा उर्दू (पर्सो अरेबिक) लिपीतही लिहितात. भात हा त्यांचा मुख्य आहार आहे. सगोत्र पद्धतीनुसार वागणार्‍यांमध्ये ‘गोर’ वर्गातील लोक प्रामुख्याने संस्कृत विद्वान आणि पौरोहित्य करणारे आहेत. ‘कर्कुन’ वर्गातील शासकीय पदे भूषवणारे लौकिक कर्तव्य पाळतात. बुहूर, पूर्जी हे त्यातीलच खालच्या वर्गातील आहेत.

आ. धार्मिक पद्धती आणि परंपरा : डोक्यावर जटा, शिखा, अंगावर जानवे ही ब्राह्मणांची लक्षणे. सर्वजण शिव आराधना करणारे आहेत. शैव, शक्ती (दुर्गा) ही त्यांची मुख्य आराध्य दैवते आहेत. ते विभूती, रुद्राक्ष धारण करत नसले, तरी देवपूजेत बेलपत्रांनाच अधिक महत्त्व देतात. त्यांच्या सणांमध्ये नवरात्रीला अधिक महत्त्व आहे. त्या दिवसांमध्ये ते शिव, शक्ती या दोघांचीही पूजा केल्यानंतरच उत्सव आणि सामूहिक भोजन करतात. त्यांना इष्टलिंग धारण करणे मान्य नाही. देवळात शिवलिंगाची किंवा घरातही शिवलिंगाची पूजा करतात.

इ. काश्मिरी हिंदूंचे पंथ : त्यांच्या धार्मिक पंथाला ‘काश्मीर शैव’ म्हणूनच बिंबवले गेले आहे. त्याला परिभाषेत ‘त्रिक दर्शन’ म्हणूनही म्हटले जाते. ‘प्रत्यभिज्ञादर्शन’ असे नावही आहे. नर-शक्ती-शिव हेच त्रिक आहेत. आपल्यातील शक्ती किंवा तेजाला व्यक्तीने साधनेद्वारा ध्यान, तप, श्रद्धाचरणांनी शोधल्यावर किंवा अनुभवल्यावर तोच शिव होतो. अहंभाव हा सोहं होतो. हे शंकराच्या अद्वैताच्या प्रकारे देह म्हणजे माया. काश्मीर शैवांपेक्षा वीरशैव वेगळे असले, तरी त्याचा प्रभाव वीरशैवांवरही झाला आहे. काश्मीर शैव अधिक संप्रदायनिष्ठ आणि वीरशैव अधिक समाजनिष्ठ असतात.

इ. कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था : त्यांच्यात एकपत्नी व्यवस्था आहे. त्यांच्यामध्ये सगोत्र विवाहाला प्राधान्य आहे. समान धर्मियांसमवेत एकत्रित भोजन करतात; पण मुसलमान, ख्रिश्‍चन यांच्यासमवेत भोजन घेत नाहीत.

५. ऋषि, संत आणि देवभक्त यांच्यासाठी पवित्र असलेले काश्मीर

एकूणच काश्मीरमधील शैवांनी भारतीय समाजाला दिलेली देणगी अपार आहे. पूर्वीच्या काळातील पंडितांनी लिहिलेले दार्शनिक ग्रंथ, काव्य अजूनही विश्‍वमान्य आहेत. दहाव्या शतकात पंडित कल्हण यांनी त्यांच्या ‘राजतरंगिणी’मध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण काश्मीरला हिंदु संत, ऋषि आणि देवभक्त यांनी पवित्र मानले आहे.

६. काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांचा पुस्तकांमध्ये उल्लेख

१४-१५ व्या शतकांपर्यंत काश्मीरमध्ये सुरक्षित असलेले पंडित बळाने बाहेर हाकलले गेले. पंडितांच्या जटा, शिखा, जानवे कापून त्यांच्यातील अनेकांचे इस्लामीकरण करण्यात आले. राहुल पंडित यांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव ‘अवर मून् हॅज ब्लड क्लॉट्स’ या आत्मकथेत लिहिलेले आहेत. त्यात स्वातंत्र्यपूर्व, तसेच नंतरच्या काश्मीरमध्ये झालेल्या पंडितांच्या नरसंहाराचे ‘झाकलेल्या’ कथा मांडल्या आहेत. आर्.एल्. भट यांच्या साहित्यामध्ये तेथील देवळांच्या विनाशाचे एक संक्षिप्त चित्रच समोर मांडले आहे.

७. हिंदु धर्माचे बौद्धिक आणि धार्मिक केंद्र असलेले काश्मीर मशिदी अन् दर्गे यांनी भरलेले

महंमद गझनीने केलेल्या आक्रमणापासून काश्मीर आणि भारतभरातील देवालयेे यांच्या मशिदी झाल्या. काश्मीरमधील १० जिल्ह्यांत १ सहस्र ४०० देवळे होती, त्यातील ७५ टक्के देवळांचा बर्‍यापैकी भाग नष्ट झाला आहे. पूर्वी काश्मीरमध्ये नागूबल संकीर्ण, गोतमनाग, मार्तंड संकीर्ण, बिज बिहार, सीताकोट, पुकुल, अभिनवगुप्त हुगा, शीतलनाथ, विचार नाग, शारिका (काश्मीरमधील अधिदेवता), सरस्वती शारदा, नृसिंहाश्रम, ऋकाश्रम, अधिष्ठान मठ इत्यादी मुख्य मंदिरे, आश्रम आणि पवित्र क्षेत्रे होती. कित्येक मंदिरे भग्न झाली आहेत. श्रीनगर जवळील १ सहस्र फूटांहून अधिक उंच असलेल्या टेकडीवरील शंकराचार्य मंदिरही भग्न झाले आहे. हिंदु धर्माचे बौद्धिक, धार्मिक केंद्र असलेले काश्मीर आज मशिदी आणि दर्गे यांनी भरलेले आहे.

८. काश्मिरी पंडितांच्या अत्याचारांना वाचा न फुटण्याला ते ‘ब्राह्मण’ असणे कारणीभूत

काश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टा बर्‍याच जणांना ठाऊक नाहीत. मलाही त्याची माहिती नव्हती. अन्य लोकांसारखी स्थूल जाणीव मला होती. भारतावर पूर्वीपासून परकियांनी आक्रमणे केली आहेत; पण काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अत्याचारांना म्हणावी तेवढी वाचा फुटलेली नाही. त्याला कारण म्हणजे तिथे मरण पावलेले ‘ब्राह्मण’ आहेत. ब्राह्मण म्हणजे आज बहुजनांसाठी हेटाळणीचा विषय आणि तिरस्कृत. त्यांच्यावर (काश्मीरमधील पंडितांवर) झालेले अन्याय लोकांच्या मनावर बिंबलेले नाहीत. खालच्या वर्गावर जर हे अन्याय झाले असते, तर ती मोठी बातमी झाली असती. काही ठिकाणी दंगेही झाले असते; पण पंडितांवर अत्याचार झाल्यावर, तर काहींना पंडितांची ‘हत्या झाल्याने समाधान’ही वाटले असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नाही. काश्मीर भारतात आल्यावर मुसलमानेतरांवर पुष्कळ आक्रमणे झाली आहेत, हे महत्त्वाचे आहे.

९. ‘विवाह कायदा’ सर्वांसाठी समान लागू करा !

अल्पसंख्यांकांच्या टक्केवारीतील भरणा हिंदूंच्या संख्येहून अमर्याद आहे. मुसलमान सहजपणे ४ विवाह करून अनेक मुले जन्माला घालून पत्नींना तलाक देऊन पुन्हा ४ जणींशी विवाह करून मुलांना जन्माला घालू शकतात. त्यामुळे असा कायदा रहित करून ‘विवाह कायदा’ सर्वांसाठी समान लागू केला पाहिजे. नाहीतर पुढे संपूर्ण भारत काश्मीरसारखा इस्लाममय होण्याची शक्यता आहे.

– डॉ. एम्. चिदानंदमूर्ती, लेखक, ज्येष्ठ संशोधक.

(संदर्भ : कन्नड मासिक ‘मेरू’, एप्रिल २०१६)