हिंदु राष्ट्राचा संकल्प कराच !

हिंदूबहुल भारताला कधी ख्रिस्ती बनवण्याची, तर कधी इस्लामी राष्ट्र बनवण्याची भाषा होत असते. आताही एक इस्लामी प्रचारक मुजाहिद बालुसेरी याने ‘केरळच्या प्रत्येक मुसलमानाला प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये पाठवावे. आम्ही केवळ १० वर्षांत केरळला इस्लामी (खिलाफत) राज्य बनवू’, अशी दर्पोक्ती केली आहे. त्याने अगदी उघडपणे आणि निर्भयपणे या धमकीचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर एकही पुरोगामी, डावे, साम्यवादी, समाजवादी, निधर्मी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे यांपैकी कुणीही अवाक्षरही काढलेले नाही. याउलट ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द जरी उच्चारला, तरी याच मंडळींची तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा लोकशाही धोक्यात असल्याचे यांना वाटते, राज्यघटना पालटली जाण्याची, तसेच व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य याची गळचेपी होण्याची स्वप्ने पडू लागतात. जणू उद्याच हिंदु राष्ट्र येणार आहे, असे या मंडळींच्या विरोधाचा सूर असतो; पण या हिंदूबहुल देशाला ‘इस्लामी राष्ट्र’ करण्याची भाषा होत असतांना हे सर्व जण कुठल्या बिळात जाऊन लपतात आणि का लपतात ? हे कळायला मार्ग नाही. आता यांना लोकशाही, राज्यघटना धोक्यात असल्याचे वाटत नाही का ?  मुजाहिद बालुसेरी याने ही गरळओक आताच केली आहे, असे नाही. वर्ष २०१७ मध्येही त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून मंदिरांची तुलना वेश्यालयाशी केली होती. त्यामुळे एकूणच हा माणूस हिंदुद्वेषाने पछाडलेला आहे. त्याचे भारताला इस्लामी राष्ट्र करायचे मनसुबे येथील प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत. यासाठी हिंदूंनाही संघटित व्हावे लागेल. हिंदूबहुल देशात हिंदूंनाच अशी एक प्रकारची धमकी मिळणे संतापजनक आहे. सरकारने अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि हिंदूंनीही हे सत्यात येऊ द्यायचे नसेल, तर आताच संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला पाहिजे अन् त्या दिशेने कृतीशील झाले पाहिजे !