चातुर्मासात एकादशीच्या निमित्ताने काही शब्दांचे अर्थ

॥ श्री विष्णवे नमः ॥

१ जुलै या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवसापासून चालू झालेल्या चातुर्मासाच्या निमित्ताने प्रत्येक एकादशीला प्रतिदिनच्या वापरातील नेहमीचेच शब्द; परंतु त्या शब्दांचे विशेष आणि नवीन अर्थ उद्धृत करून ते आपणा सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न चालू केला आहे.

या चातुर्मासाच्या अंतर्गत आज, १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या इंदिरा एकदशीनिमित्त ‘नैवेद्य’ या शब्दाचा अर्थ पाहुया.

चतुर्विधंकुलेशानिद्रव्यञ्चषड्रसान्वितम् ।
निवेदनाद्भवेत्तृप्तिर्नैवेद्यं समुदाहृतम्॥

अर्थ – भगवान श्री शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात की, ‘‘नैवेद्य याचा अर्थच निवेदनास योग्य असा होतो. आपल्या इष्ट देवतेला जे भोजन निवेदित करतो, ते चतुरंग भोजन असते. त्यामध्ये जल, अग्नी, दूध आणि घृत पक्व पदार्थ असतात. तसेच कटू – आम्ल – तिक्त – कषाय – मधुर या षड्र्सात्मक चवी असतात. असे अन्न निवेदन केल्यामुळे इष्टदेवतेची तृप्ती होते त्याला ‘नैवेद्य’ म्हणतात.

– वेदमूर्ती कौशल दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.