पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील रुग्णालयातील कामावर उपस्थित न रहाणार्‍या २ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद


पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देण्यासाठी ऑपेक्स रुग्णालय प्रशासनाने अधिग्रहित केले आहे. या रुग्णालयातील २ कर्मचार्‍यांशी संपर्क साधूनही ते दोघे रुग्णालयात कामावर उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विजय जमादार यांनी २ कर्मचार्‍यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे कामावर उपस्थित न रहाणार्‍या दोन्ही कर्मचार्‍यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

शहर आणि तालुका येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने शहरातील काही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांची सेवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अधिग्रहित केली आहे, असे असूनही २ कर्मचार्‍यांनी त्यांना दिलेल्या कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केली.