बिहारमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे भररस्त्यातून वडिलांसमोरच अपहरण

२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

धर्मांधाकडून मुलीला बांगलादेशात विकण्याची, तर धर्मांधाच्या आईकडून मुलीला वेश्या बनवण्याची धमकी

असे व्हायला हा भारत आहे कि पाक ? सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकावे !

प्रतिकात्मक छायाचित्र

बेगूसराय – बिहारमध्ये धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे भररस्त्यातून तिच्या वडिलांसमोरच अपहरण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी इजमुल खान उपाख्य नज्मुल उपाख्य आर्यन, महंमद मुनफर, अंजुम अंसारी उपाख्य चाँद महंमद आणि फरत यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी या चौघांविरुद्ध प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे. ‘ऑपइंडिया’ या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. मुलगी अल्पवयीन असूनही पोलिसांनी ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला नसल्याचे या संकेस्थळाने म्हटले आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी या संकेतस्थळा सांगितले, ‘‘२६ जुलै या दिवशी सायंकळी ५ वजता मी माझ्या मुलीला घेऊन बाजारातून घरी चाललो होतो. त्या वेळी ४ जण एका विनाक्रमांकाच्या बोलेरो गाडीतून आले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून माझ्या मुलीचे अपहरण केले. या वेळी त्यांनी मला ‘हे पाकिस्तान असते, तर आम्ही तिला घरातूनच उचलून गेलो असतो’, अशा शब्दांत धमकी दिली. हे चौघे जण एकाच कुटुंबातील आहेत. ही घटना उघड न करता अगोदर मी आणि माझी पत्नी नज्मुलच्या घरी गेलो आणि मुलीला सोडण्याची मागणी केली. तेव्हा त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आम्हा दोघांना मारहाण केली, तसेच माझ्या पत्नीचे दागिने हिसकावून घेतले. नज्मुलची आई हसीना खातून ही माझ्या पत्नीला म्हणाली की, ‘कुत्रे जातेस की नाही येथून ? नाहीतर मी तुझ्या मुलीला बाजरात विकून टाकीन आणि तिला वेश्या बनवीन.’ यापूर्वीही नज्मुल आणि हसीना या दोघांनी अशा प्रकारचे कृत्य केले आहे. यानंतर ३० जुलै या दिवशी एक जण एका विनाक्रमांकाच्या गाडीवरून आला आणि मला त्याच्यासमावेत घेऊन गेला. त्याने गाडी रस्त्यात थांबवून ‘तुझी मुलगी तुला परत हवी असेल, तर २ लाख रुपये दे’, अशी मागणी केली. ही रक्कम हसीनाकडे जमा करावी लागेल, असेही तो म्हणाला.’’