काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या प्रकरणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान

हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी वैध मार्गाने लढा देणारे डॉ. स्वामी नेहमीच हिंदूंसाठी आदर्श असतील !

नवी देहली – काशी येथील विश्‍वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर यांच्या विषयीच्या वादाच्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. डॉ. स्वामी यांनी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याच्या विरोधात ही याचिका केली असून ‘हा कायदा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे’, असे त्यांनी यात म्हटले आहे.

यापूर्वीच हिंदु पुजार्‍यांच्या संघटनेने या कायद्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यानंतर मुसलमानांच्या ‘पीस पार्टी’नेही या खटल्यात पक्षकार बनवण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली आहे.