पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून मागे हटण्यास चीनचा नकार

चीनला त्याच्याच भाषेत उत्तर देणे अपरिहार्य आहे, हेच यातून स्पष्ट होते !

नवी देहली – लडाखच्या पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून माघार घेण्यास चीनच्या सैन्याने नकार दिला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यासही प्रारंभ केला आहे.

चीनने पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून माघार घेण्यास दिलेला नकार आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सैन्याची वाढती संख्या, या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैनिक आणि नौदल सतर्क आहेत.