संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या आईने मला कपाळावरील टिळा आणि विभूती पुसण्यास सांगितले ! – तमिळ गीतकार पिरईसूदन यांचा दावा

बाटगे अधिक कडवे असतात, याचे हे आणखी एक उदाहरण ! अशांना कुणी धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजत नाही, हे लक्षात घ्या !

तमिळ गीतकार पिरईसूदन

चेन्नई (तमिळनाडू) – प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या घरी गेल्यावर रेहमान यांच्या आईने मला कपाळावरील टिळा आणि विभूती पुसण्यास सांगितले; मात्र मी त्यासाठी नकार दिला होता, अशी आठवण तमिळ गीतकार पिरईसूदन यांनी एका मुलाखतीत सांगितली.

१. रेहमान हे पूर्वी हिंदू होते. त्यांचे वडील आणि बहीण फारच आजारी असतांना मुसलमानांच्या एका सुफी संप्रदायातील व्यक्तीने त्यांच्या बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याची अट घातली होती. (हिंदूंचे संत कधी कुणाला साहाय्य करण्यासाठी धर्मांतराची अट घालतात का ? यातून अन्य धर्मियांमध्ये किती धर्मांधता आहे, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) त्यानंतर रेहमान मुसलमान बनले.

२. रेहमान यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूला हिंदु देवतांना उत्तरदायी ठरवले होते. ते म्हणाले होते की, ‘माझे वडील ज्या देवांची पूजा करत होते, त्यांनीच त्यांचे प्राण घेतले.’ (हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांना देवतांविषयी आणि धर्मशास्त्राविषयी माहिती मिळत नाही अन् ते अन्य धर्मियांकडून केल्या जाणार्‍या धर्मांतराला बळी पडतात ! रेहमान हे त्याचे एक उदाहरण होय ! यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही ! – संपादक)