राजस्थानमधून चोरलेली भगवान शिवाची ९ व्या शतकातील मूर्ती २२ वर्षांनी लंडनहून परत मिळणार !

भारतातील प्राचीन मूर्तींची चोरी होऊन त्या विदेशात कशा जातात ? पुरातत्व विभाग झोपलेला असतो का ? प्राचीन मूर्तींचे संवर्धन करू न शकणारा असा विभाग विसर्जित करा !

लंडन – राजस्थानमधील बरौली येथील श्री घाटेश्वर मंदिरातून भगवान शिवाची ९ व्या शतकातील अतीप्राचीन मूर्ती फेब्रुवारी १९९८ मध्ये चोरण्यात आली होती. वर्ष २००३ मध्ये ती लंडनमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली होती.

 आता ही मूर्ती भारताला परत मिळणार आहे. दगडापासून बनवलेली ही मूर्ती ४ फुटांची असून ती भगवान शिवाच्या नटराजाच्या रूपात आहे. ही मूर्ती म्हणजे ८ व्या ते ११ व्या शतकात राज्यस्थानमध्ये राज्य करणार्‍या गुर्जर-प्रतिहार वंशाच्या काळातील राजस्थानी कलेचा दुर्लभ आणि अद्भूत नमूना आहे.