बकरी ईदच्या दिवशी पाकमध्ये अज्ञातांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या

पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची हत्यासत्रे चालू असूनही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, केंद्र सरकार आदी कुणीच आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या ! पाकसह जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

राजा किशन चंद

इस्लामाबाद – बकरी ईदच्या दिवशी पाकमधील खेरपूर येथे अज्ञातांकडून एका हिंदु व्यापार्‍याची हत्या करण्यात आली. राजा किशन चंद असे त्यांचे नाव आहे. किशन हे त्यांच्या घरी जात असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यात ते मृत्यूमुखी पडले. पाकमधील एकाही वृत्तपत्राने राजा किशन चंद यांच्या हत्येचे वृत्त प्रसारित केलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांकडून सामाजिक माध्यमांद्वारे या घटनेची माहिती देऊन पाकमधील पीडित हिंदूंना न्याय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पाकमधील अन्य एक हिंदु व्यापारी मैनक मल यांच्या चारचाकी वाहनावर काही बंदूकधारी आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला. त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले होते.