ज्यूंनी इस्रायलच्या स्थापनेसाठी निर्धार केला, तसा आपणही हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करूया !

पू. संदीप आळशी

‘जगभरात केवळ ‘ज्यू’ म्हणून अनन्वित अत्याचार सोसत असतांनाही ज्यू त्यांच्या प्रार्थनेच्या वेळी म्हणत, ‘पुढच्या वर्षी सर्व ज्यू इस्रायलमध्ये भेटू !’ या एकाच ध्येयनिष्ठ विचारामुळे शेकडो वर्षे सर्व संकटांना तोंड देण्यासाठी ज्यूंच्या अंगी हत्तीचे बळ आले आणि अंती त्यांनी इस्रायलची स्थापना केली. केवळ हिंदूंच्याच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करतांना अधर्मी प्रवृत्तींकडून प्रचंड विरोध सहन करावा लागणे स्वाभाविकच आहे. साधकांनी ‘आता ध्येय हिंदु राष्ट्र-स्थापनेचेच आणि त्यासाठी गुरुच बळ देतील’, अशी गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून ‘साधना’ म्हणून हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य केले, तर त्यांनाही सर्व संकटांना तोंड देण्याचे बळ निश्‍चितच लाभेल आणि हिंदु राष्ट्रही स्थापन होईल.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२८.२.२०२०)