(म्हणे) ‘आमच्यासाठी ५ ऑगस्ट हा ‘काळा दिवस !’

  • जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचे विधान

  • कलम ३७० हटवण्याच्या विरोधात सामूहिक संघर्ष करण्याची आवश्यकता असल्याचे फुत्कार

भारतात राहून पाकची भाषा बोलणारे लोकप्रतिनिधी, तथाकथित विचारवंत, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आदींना सरकारने पाकमध्येच पाठवून द्यावे !

मेहबूबा मुफ्ती व इल्तिजा मुफ्ती

श्रीनगर – आमच्यासाठी ५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस नव्हे, तर ‘काळा दिवस’ आहे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी केले. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याला ५ ऑगस्टला १ वर्ष पूर्ण होत आहे. ३७० कलम हटवल्यानंतर केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत ठेवले होते. सरकारने ३१ जुलै या दिवशी त्यांच्या नजरकैदेत ३ मासांची वाढ केली आहे. या पार्श्‍वभूमीवर इल्तिजा यांनी वरील विधान केले आहे.

(सौजन्य : वनइंडिया हिन्दी)

इल्तिजा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, ‘कलम ३७० हटवण्याच्या विरोधात सामूहिक संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. येथे कुणालाही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. सर्व लोक कारागृहात आहेत. कलम ३७० हटवल्यामुळे आतंकवाद संपणार नाही, हे वसीम बारी यांच्या झालेल्या हत्येवरून सिद्ध झाले आहे.’