भारतानंतर आता अमेरिकेकडूनही टिकटॉकवर बंदी

वॉशिंग्टन – भारतानंतर आता अमेरिकेनेही ‘टिकटॉक अ‍ॅप’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका विशेष आदेशासह तेथे तात्काळ ही बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

‘आम्ही आणखी काहीही करू शकतो. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय आहेत’, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले. ‘बाईटडान्स’ ही कंपनी ‘टिकटॉक’ विकण्याच्या सिद्धतेत आहे.