हिंदु राष्ट्राची स्थापना घटनाविरोधी असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, कारण –

> बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ राज्यघटनेत ‘निधर्मी’ असा उल्लेख कोठेही नव्हता. पुढे इंदिरा गांधी यांनी घटनेत सुधारणा करून तो शब्द अंतर्भूत केला आहे. इंदिरा गांधींची ही भूमिकाच लोकशाहीविरोधी आहे.

> हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती राष्ट्रीय हिताला धरून असतील, त्यामध्ये कोणतीही घटनाबाह्य कृती नसेल.

> भारतीय राज्यघटनेत अनेक हिंदूविरोधी तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटना पूर्णतः मान्य आहे, असे हिंदू म्हणू शकत नाही. हिंदू आणि राष्ट्र यांच्या हितासाठी या राज्यघटनेत अनेक सुधारणा होणे अपेक्षित आहे.

> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हिंदूंना मत असण्याचा आणि तो प्रसारित करण्याचा अधिकार देते. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचा प्रसार करणे’, हा हिंदूंचा घटनादत्त अधिकार आहे.