(म्हणे) ‘चीन भारतासाठी धोकादायक नाही !’ – चीन

या विधानावर शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ? चीनची अशी विधाने त्याच्या विश्‍वासघातकी वृत्तीची झलकच दाखवते ! भारताने ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या गोंडस घोषणेनंतरही चीनकडून झालेला विश्‍वासघात अनुभवल्यावर चीनच्या या विधानावर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही !

सून वेइडाँग

बीजिंग – चीन भारतासाठी धोकादायक नाही. ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही की, ‘आम्ही एक दुसर्‍याविना राहू शकत नाही. आम्हाला एक दुसर्‍याला हानी पोचवण्याचा विचार करू नये. चीन आणि भारत यांची अर्थव्यवस्था एकमेकांवर अबलंबून आहे. जर तिला वेगळे केले जाते, तर दोघांनाही हानी सहन करावी लागेल’, असे ट्वीट चीनचे भारतातील राजदूत सून वेइडाँग यांनी केले आहे.