महाराष्ट्रात दळणवळण बंदीमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ

मुंबई – महाराष्ट्रातील दळणवळण बंदीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा कालावधी वाढवतांना ‘पुनश्‍च हरि ॐ ।’च्या घोषणेच्या अंतर्गत काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहेत.

दळणवळण बंदीविषयी शासनाची मार्गदर्शक सूत्रे

१. दुचाकीवरून दोघांना जाण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र प्रवास करतांना तोंडाला ‘मास्क’ लावणे आणि डोक्यावर शिरस्त्राण घालणे आवश्यक आहे.

२. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने स्थानिक महानगरपालिकेच्या नियमानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत चालू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे.

३. मद्याच्या दुकानांसाठी घरपोच सेवेचा पर्याय देण्यात आला आहे.

४. घराबाहेरील खेळांना सामाजिक अंतर पाळून अनुमती देण्यात आली आहे; मात्र ‘स्विमिंग पूल’ला अनुमती दिलेली नाही. व्यायामशाळा उघडण्याला अनुमती देण्यात आली आहे.

५. टॅक्सी, चारचाकी, ‘कॅब’ यांमध्ये चालकासहित ३ प्रवासी, रिक्शामध्ये चालकासहित २ प्रवासी बसण्याला अनुमती देण्यात आली आहे.

६. ‘मॉल्स’ आणि ‘मार्केट कॉम्प्लेक्स’ ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडण्याला अनुमती देण्यात आली आहे; मात्र त्यामध्ये चित्रपटगृह, खाद्यपदार्थांची दुकाने आणि ‘रेस्टॉरंट’ उघडण्यास अनुमती देण्यात आलेली नाही.

७. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाविषयी मात्र शासनाने निर्णय घोषित केलेला नाही.