जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्षांवर गुन्हा नोंद

कोल्हापूर – खासगी सावकारीतून व्याजाने घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या मोबदल्यात प्रविण पाटील यांनी व्याजासह १० लाख रुपये भरलेले असतांना त्यांच्याकडून आणखी ४ लाख रुपयांची मागणी करणारे, तसेच शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.