खंडणी वसूल करणार्‍यास नगर येथील पोलिसांकडून अटक

गुन्हेगारी वृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाला नीतीमान करणारे धर्मशिक्षण देणेच आवश्यक !

नगर – ‘हॉटेल’चालकाला धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी घेतांना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एकाला कह्यात घेतले. त्याच्याकडील रक्कम जप्त करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने ३ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी काही रक्कम घेतांना कारवाई करण्यात आली.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करून ‘हॉटेल’चा परवाना रहित करण्याची धमकी आरोपीने दिली होती.