गृहनिर्माण संस्थांसाठी १२ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर 

पुणे – काही गृहनिर्माण संस्था जिल्हाधिकारी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या आदेशांचे पालन न करता स्वतःचे वेगळे नियम सिद्ध करत होत्या. याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या वतीने गृहनिर्माण संस्थांसाठी १२ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसमवेत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग या आजारांशी लढणार्‍या रहिवाशांची विशेष दक्षता घेण्यात यावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा आणि सॅनीटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखणे या उपाययोजनांच्या विषयी जनजागृती करावी अशा सूचनाही निर्देशित केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घालून दिलेल्या आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी औंध येथील रोहन निलय या हौसिंग सोसायटीच्या चेअरमनवर नुकताच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोसायटीत नव्याने रहाण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला वैद्यकीय प्रमाणपत्र मागत सोसायटीत घेण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.